Chandrapur Pachgaon Illicit Liquor विरोधात राजुरा पोलीस प्रशासनाला निवेदन देतानाचे दृश्य

चंद्रपुरात अवैध दारूचा विळखा; युवकाच्या मृत्यूने खळबळ, कारवाईची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 21, 2026

राजुरा :– Chandrapur Pachgaon Illicit Liquor मुळे एका तरुण युवकाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे अवैध दारू विक्रीला मोठे उधाण आले असून यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावातील बिघडत चाललेले सामाजिक वातावरण आणि व्यसनाधीनतेमुळे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलले. या गंभीर प्रकारची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तिरूपती इंदुरबार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. (रेल्वेच्या धडकेत अस्वल ठार, वाचा वन्यजीवांच्या अपघाताची बातमी)

Chandrapur Pachgaon Illicit Liquor मुळे बिघडत चालले सामाजिक वातावरण

पाचगाव परिसरात काही व्यक्तींकडून अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याने गावातील सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याने त्यांच्या आरोग्यावर, कौटुंबिक जीवनावर तसेच सामाजिक भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दारूच्या नशेत युवकाने संपवले जीवन; पाचगावमधील संतापजनक घटना

निवेदनानुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी कैलास संतोष तोडेतिवार (वय २१), रा. पाचगाव, या युवकाने दारूच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत आणि भविष्यात अशा प्रकारची अवैध दारू विक्री होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी विनंती सभापती तिरूपती इंदुरबार यांनी केली आहे. निवेदनाची प्रत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांनाही देण्यात आली असून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अवैध दारूची विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना केल्या आहेत.

यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदाताई जेनेकर, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरसेवक एजाज अहमद, न प सभापती पूनम गिरसावळे, अन्नुताई संधु, नगरसेविका इंदुबाई निकोडे, मंगला मोकडे, पोर्णिमा सोयाम, सुमित्राबाई कुचनकर, संघपाल देठे, कुणाल मोकळे यासह राजुरा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment