Chandrapur Plastic Fine Action मनपा स्वच्छता विभागाकडून अन्नपूर्णा स्वीट्सवर दंड

चंद्रपूर बागला चौकात मनपाचा छापा; अन्नपूर्णा स्वीट्सवर ५ हजार रुपयांचा दंड, १३ किलो प्लास्टिक जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 11, 2026

चंद्रपूर : Chandrapur Plastic Fine Action अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरात प्लास्टिकविरोधी मोठी कारवाई केली आहे. स्वच्छता विभागाच्या पथकाने बागला चौकातील अन्नपूर्णा स्वीट मार्टवर थेट छापा टाकला. या तपासणी मोहिमेत दुकानातून सुमारे १३ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले. संबंधित दुकानदारावर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील ५२८ गुन्हेगारांवर कारवाई)

चंद्रपूर मनपाने शहरातील सर्व व्यापाऱ्यांना प्लास्टिकचा वापर त्वरित बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. यापुढेही अशी धडक तपासणी सातत्याने सुरू राहणार आहे.

Chandrapur Plastic Fine Action अंतर्गत अन्नपूर्णा स्वीट्सवर कारवाई

सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास आळा घालण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरात तपासणी व कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत महाकाली प्रभाग क्र. १२, स्वच्छता विभाग झोन क्र. २ (ब) अंतर्गत बागला चौक येथील अन्नपूर्णा स्वीट मार्ट या दुकानाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान दुकानात अंदाजे १२ ते १३ किलो सिंगल यूज प्लास्टिक आढळून आले. त्यानुषंगाने संबंधित दुकानमालकावर प्रथम वेळेस रु. ५,०००/- दंड आकारण्यात आला असून, आढळून आलेले सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले.

शहरातील दुकानदार, व्यावसायिक आस्थापना व नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात महानगरपालिकेची तपासणी व नियमानुसार कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

या मोहिमेंतर्गत महेंद्र हजारे, स्वच्छता अधिकारी, दिनेश खोटे, प्र. शिपाई, शरद बकसरिया, सफाई कामगार, भिमन्ना आत्राम, कंत्राटी सफाई कामगार, राहूल गगपल्लीवार (NDS Squad) सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार स्वच्छता विभाग,झोन क्रमांक 2(ब), सदरची कार्यवाही च्या वेळेस उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment