जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना कंपनी प्रतिनिधी, प्रोजेक्ट अक्षर बालदिन उपक्रम

‘प्रोजेक्ट अक्षर’ अंतर्गत २५० विद्यार्थ्यांना मदत; धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपक्रम

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 17, 2026

  चंद्रपूर : –  चंद्रपूर: प्रोजेक्ट अक्षर बालदिन उपक्रमांतर्गत १० गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टिपर्पज सोसायटी यांनी हा उपक्रम संयुक्तपणे राबवला. राष्ट्रीय बाल दिनाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबर रोजी हे वाटप झाले. कंपनीचे उपाध्यक्ष तथा प्लांट हेड देवेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

प्रोजेक्ट अक्षर बालदिन उपक्रम काय आहे?

देशाचे खरे धन हे लहान मुले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती च्या निमित्ताने 14 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो.  मुलांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार आणि चांगले आरोग्य मिळाले तरच भारत प्रगती करेल.  या दिवशी  मुलांना त्यांचे हक्क आणि त्यांचे महत्त्व याची जाणीव करून दिली जाते. आजच्या काळात बाल दिनाचे महत्त्व अधिक वाढले आहे परंतु अनेक मुले अजूनही साहित्य अभाव व आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या माध्यमातुन नजीकच्या १० गावांमध्ये  बालदिनाचे औचित्य साधत २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असल्याचे प्रतिपादन धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे उपाध्यक्ष तथा प्लांट हेड देवेश कुमार यांनी केले. (आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला १३ दिवसानंतर यश, वाचा बातमी)

      धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘प्रोजेक्ट अक्षर’ (Project Akshar) या शैक्षणिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा शेणगाव, वढा, पांढरकवडा, धानोरा, अंतुर्ला, सोनेगाव, येरुर, ताडाळी, मोरवा व चारगाव या १० गावांमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

           प्रसंगी धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिश नायर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भूषण तुराणकर, जिल्हा परिषद शाळा शेणगावचे मुख्याध्यापक श्री. सुनील ढोके, श्री. प्रतीक वानखेडे, श्री. ब्रँडन डिसुझा यांची प्रमुख उपस्थिती होती अशी माहिती उपप्रबंधक रवी चावरे यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली.

           विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रसंगी वातावरण निर्माण झाले. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टिपर्पज सोसायटी यांचे संयुक्त प्रयत्न असल्याचे देवेश कुमार यांनी या उपक्रमातून अधोरेखित केले. 

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “‘प्रोजेक्ट अक्षर’ अंतर्गत २५० विद्यार्थ्यांना मदत; धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपक्रम”

Leave a Comment