Chandrapur Study Center Issue and library condition in municipal corporation

चंद्रपूर महानगरपालिका अभ्यासिकांची दूरवस्था; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 29, 2026

चंद्रपूर : Chandrapur Study Center Issue चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिका आणि वाचनालयांची अत्यंत दूरवस्था झाली आहे. सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एनएसयूआयचे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी दिला आहे. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष पसरला असून विविध मागण्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिका आणि वाचनालयांची अत्यंत दूरवस्था अवस्था झाली असून, येत्या १५ दिवसांत येथील सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘एनएसयूआय’चे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिला आहे. (हे हि वाचा – डोळ्याच्या उपचारासाठी जात असताना खड्ड्यामुळे महिलेचा मृत्यू)

माजी महापौर संगीता अमृतकर यांनी यापूर्वीच अभ्यासिकेतील दुरवस्थेबाबत महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. दि. २८ ऑगस्ट रोजी पाहणी केली असता, गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छता गृहाामधील सांडपाणी थेट अभ्यासिकेत झिरपत आहे. तिथे अस्वच्छता व प्रचंड दुर्गंधी पसरली असून नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचाही मोठा तुटवडा आहे.

सध्या महापालिकेतर्फे कस्तुरबा रोड येथील म. गांधी वाचनालय, सिव्हिल लाईन्सचे हुतात्मा स्मारक वाचनालय, बाबुपेट येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिका, भानापेठ वार्डातील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी अभ्यासिका आणि गंजवार्ड येथील श्री कोलबा स्वामी महाराज असे पाच अभ्यासकेंद्र असून त्यातील अभ्यासिका भानापेठ व गंजवार्डातील अभ्यासिकेची दुरवस्था झाली आहे. येत्या १५ दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत न केल्यास महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयचे प्रदेश सचिव आशिष बोडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या प्रसंगी मनीष दास, सचिन हरणे आणि शुभम रत्नपारखी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment