Chandrapur tadi Shop Auction notice by State Excise Department

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ताडी दुकानांचा होणार जाहीर ई-लिलाव; १८ सप्टेंबरला ऑनलाइन बोली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 3, 2026

चंद्रपूर : Chandrapur Tadi Shop Auction चंद्रपूर जिल्ह्यातील १६ ताडी दुकानांच्या वर्ष २०२६-२७ करिता अनुज्ञप्ती मंजूर करण्यासाठी जाहीर ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही अधिकृत निविदा १ सप्टेंबर २०२६ पासून महाटेंडर्स संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात सिलेंडर मधून गॅस चोरी करणारे रॅकेट सक्रिय)

इच्छुक व्यावसायिकांना १८ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाइन ई-लिलाव पद्धतीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

Chandrapur Tadi Shop Auction : १६ ताडी दुकानांसाठी जाहीर ई-लिलाव प्रक्रिया सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांच्या ताडी वर्ष 2026-27 करिता अनुज्ञप्ती मंजूर करण्यासाठी जाहीर ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतची निविदा शासनाच्या अधिकृत महाटेंडर्स संकेतस्थळावर दि. 1 सप्टेंबर 2026 पासून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या या 16 ताडी दुकानांचा जाहीर लिलाव ऑनलाईन ई-लिलाव-नि-निविदा पद्धतीने दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती, प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती शासनाच्या महाटेंडर्स (www.mahatenders.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत याबाबतची अधिक माहिती प्राप्त करता येईल.

जिल्ह्यातील संबंधित ताडी दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी याची नोंद घेऊन विहित प्रक्रियेनुसार ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment