Chandrapur Gas Scam illegal cylinder refilling caught at Gopika agency

तुमच्या सिलिंडरमधून गॅस चोरी? चंद्रपुरात आप ने फोडले बिंग

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 2, 2026

चंद्रपूर : Chandrapur Gas Scam प्रकरणात राष्ट्रवादी नगरातील खासगी गोदामात अचानक धाड टाकण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा काळाबाजार सुरू होता. नागरिकांच्या तक्रारीवरून आम आदमी पार्टीने ही धडक कारवाई केली. घटनास्थळावरून तब्बल ६० गॅस सिलिंडर आणि रिफिलिंग साहित्य पकडले असल्याचा दावा आप ने केला आहे.

या कारवाईमुळे शहरातील अवैध गॅस रिफिलिंग माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडे तत्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करून काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा आम आदमी पार्टीने (AAP) पर्दाफाश केला आहे. राष्ट्रवादी नगर परिसरातील ‘एका गोदाम’मध्ये हा गोरखधंदा सुरू असतानाच ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकून तब्बल ६० गॅस सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य रंगेहात पकडले., हि माहिती आपच्या वतीने देण्यात आली आहे, अवघ्या १५ दिवसांत ‘आप’ने चंद्रपुरात उघडकीस आणलेले हे दुसरे मोठे रॅकेट असल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात गॅस चोरीचे रॅकेट उघड)

घरगुती सिलिंडरमध्ये गॅस कमी; नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई

मागील अनेक दिवसांपासून चंद्रपुरातील सर्वसामान्य ग्राहकांकडून घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गॅसचे वजन कमी भरत असल्याच्या तीव्र तक्रारी आम आदमी पार्टीकडे येत होत्या. ग्राहकांची ही लूट गांभीर्याने घेत ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत स्तरावर तपास सुरू केला. १५ दिवसांपूर्वीच दाताला भागात असाच घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा बेकायदेशीर प्रकार ‘आप’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर आज, २ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी नगर भागातील खासगी गोदामात’मध्ये असाच काळाबाजार सुरू असल्याची पक्की माहिती समोर आली.

६० सिलिंडर आणि रिफिलिंग यंत्रणा जप्त

माहितीच्या आधारे ‘आप‘चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि सुनील मुसळे यांच्या नेतृत्वात पक्षातील पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी नगरातील आवारात अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडर आणि वाहनांमध्ये गॅस भरण्याचे साहित्य, नोजल, पाईप्स तसेच तब्बल ६० गॅस सिलिंडर जागेवरच आढळून आले.

प्रशासनाला पाचारण; कठोर कारवाईची मागणी

या संपूर्ण कारवाईची माहिती तातडीने पुरवठा विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. गॅस एजन्सीच्या आडून सुरू असलेल्या या जीवघेण्या आणि बेकायदेशीर कृत्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून एजन्सीचा परवाना रद्द करावा आणि मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. या धडक कारवाईमुळे चंद्रपुरातील अवैध गॅस रिफिलिंग माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या प्रशासनामार्फत आपच्या तक्रारीची व गॅस एजन्सी ची चौकशी सुरु आहे. सदर बेकायदेशीर गॅस गोदामा मध्ये बेकायदेशीर रित्या हे काम सुरु होते का? त्यांनी यापूर्वी हा कारभार केला होता का याबाबत सखोल चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येणार. बातमी अपडेट होत आहे..

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment