Chandrapur Bogus Construction Scam Site Inspection

चंद्रपुरात मनपा शाळेत कोट्यवधींचा बोगस कारभार; ‘आप’ने उघडकीस आणला धक्कादायक गैरव्यवहार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 5, 2026

चंद्रपूर — Chandrapur Bogus Construction Scam मुळे चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. इंदिरा नगर प्रभागातील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या बांधकामात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. तब्बल ३ कोटी ५४ लाख रुपयांच्या या प्रकल्पात निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. आम आदमी पक्षाने केलेल्या पाहणीत ही धक्कादायक बाब समोर आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Chandrapur Bogus Construction Scam: कोट्यवधींच्या कामात कसा झाला गैरव्यवहार?

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरा नगर प्रभागात पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या (सेमी इंग्लिश) ३ कोटी ५४ लाख रुपये खर्चाच्या इमारत बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता हे काम अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाचे होत असल्याचा गंभीर खुलासा आम आदमी पक्षाने केला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात शिंदेसेनेला सुरुंग)

आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री श्री. संतोष बोपचे यांनी सदर बांधकाम स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. नियमानुसार इमारतीचा कॉलम पायापासून जमिनीच्या आत खोलवर उभारला जाणे आवश्यक असताना, ठेकेदाराकडून कॉलम व बीम केवळ तारेने जोडून वर उभे केले जात असल्याचे आढळले. अशा प्रकारे जोडकाम केलेल्या कॉलमवर इमारत कशी उभी राहणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच काँक्रिटिंगचे काम सुरू असताना त्यामध्ये आवश्यक प्रमाणात रेती व सिमेंट वापरले जात नसून केवळ गिट्टी वापरली जात असल्याचेही निदर्शनास आले, जे बांधकामाच्या गुणवत्तेवर व सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

उल्लेखनीय म्हणजे हे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप केवळ जोतेच उभे राहिले असून काम पूर्णत्वास आलेले नाही.

या बोगस कामाबाबत संबंधित अभियंता श्री. पवार यांना माहिती देण्यात असता, “ठेकेदार माझे ऐकत नाही, मी काहीही करू शकत नाही” असे उत्तर त्यांनी दिले — जे ठेकेदाराची मुजोरी आणि महानगरपालिकेच्या अभियंत्यांची जबाबदारी झटकण्याची वृत्ती स्पष्ट करते. तसेच याबाबत मनपा आयुक्तांनाही दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली असता, त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे त्यांनी टाळले.

सदर बांधकाम अशाच बोगस पद्धतीने पूर्ण झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे. याबाबत तात्काळ या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी ठाम मागणी आम आदमी पक्षातर्फे महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

तसेच जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले व बोगस काम असेच सुरू राहिले, तर आम आदमी पक्ष याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारेल, असा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment