चंद्रपूर जिल्ह्यातील वनराई बंधाऱ्यात साठलेले पाणी, चंद्रपूर वनराई बंधारे

चंद्रपूर जिल्ह्यात २४३ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती; ५३.४६ सहस्र घनमीटर पाणीसाठा संरक्षित

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 20, 2026

चंद्रपूर, दि. २० नोव्हेम्बर : चंद्रपूर जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची २४३ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, त्यातून ५३.४६ सहस्र घनमीटर (TCM) पाणीसाठा संरक्षित करण्यात आला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर आणि जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी हे उपाय हाती घेण्यात आले आहेत. ग्रामपंचायती आणि लोकसहभागातून जिल्ह्यातील नाले व नैसर्गिक जलप्रवाहांवर हे बंधारे उभारले गेले. (पंचमुखी हनुमान मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा, सविस्तर वाचा)

जिल्ह्यात किती चंद्रपूर वनराई बंधारे पूर्ण?

दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील जलसाठ्यांचे संरक्षण करणे, पाण्याचा काटकसरीने वापर होणे आणि जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. लघु पाटबंधारे उपविभाग, संबंधित ग्रामपंचायती आणि लोकसहभागातून जिल्ह्यातील नाले व नैसर्गिक जलप्रवाहांवर एकूण २४३ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती पूर्ण झाली असून, त्यातून ५३.४६ सहस्त्र घनमीटर (स.घ.मी.) पाणीसाठा संरक्षित करण्यास मदत झाली आहे.

तालुकानिहाय चंद्रपूर वनराई बंधारे स्थिती

पावसाळ्यानंतर उपलब्ध पाणी अधिकाधिक काळ साठवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वाहून जाणारे पाणी अडविणे, स्थानिक पातळीवर जलसाठा निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरणास मदत होण्यासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये वनराई बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. (चंद्रपूर वनराई बंधारे) त्यानुसार आतापर्यंत २४३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये वरोरा तालुक्यात १२ वनराई बंधारे (अडविलेला पाणीसाठा २.६४ स.घ.मी.),

भद्रावती १७ बंधारे (३.७४ स.घ.मी.), राजुरा १३ बंधारे (२.८६ स.घ.मी.), कोरपना १० बंधारे (२.२० स.घ.मी.), जिवती ९ बंधारे (१.९८ स.घ.मी.), नागभीड ४५ बंधारे (९.९० स.घ.मी.), चिमूर ३ बंधारे (०.६६ स.घ.मी.), मूल ५ बंधारे (१.१० स.घ.मी.), सावली १८ बंधारे (३.९६ स.घ.मी.), गोंडपिपरी ५ बंधारे (१.१० स.घ.मी.), बल्लारपूर ५ बंधारे (१.१० स.घ.मी.), सिंदेवाही ६१ बंधारे (१३.४२ स.घ.मी.), ब्रह्मपुरी २१ बंधारे (४.६२ स.घ.मी.), पोंभुर्णा १६ बंधारे (३.५२ स.घ.मी.) आणि चंद्रपूर तालुक्यात ३ वनराई बंधारे (अडविलेला पाणीसाठा ०.६६ स.घ.मी.), असा एकूण २४३ बंधाऱ्यांतून ५३.४६ सहस्र घनमीटर पाणीसाठा अडविण्यात आला आहे.

सोबतच लघु पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी आवश्यक ठिकाणी पाट्या (गेट) बसविण्याची कामे उपविभागांमार्फत सुरू करण्यात आली आहेत. तसेच सिमेंट प्लग बंधारे, माजी मालगुजारी तलाव, लघु पाटबंधारे तलाव आणि साठवण तलावांमधील उपलब्ध पाण्याचे संरक्षण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप खंबाईत यांनी दिली. (चंद्रपूर वनराई बंधारे)

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment