चंद्रपूर : Chandrapur Voter List Update मोहिमेअंतर्गत वॉर्डनिहाय मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. मूल आणि पोंभुर्णा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचे नाव अचूक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण उपक्रमावर सविस्तर चर्चा झाली. तसेच स्थानिक पातळीवरील विविध नागरी समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. (हे हि वाचा – NHAI च्या अधिकाऱ्यांची खासदार धानोरकरांनी घेतली झाडाझडती)
“लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वॉर्डनिहाय मतदार याद्यांची अचूक तपासणी करून नवीन मतदारांची नोंदणी करणे व दुरुस्त्या वेळेत पूर्ण करणे हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे प्राथमिक कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
मूल व पोंभुर्णा शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत स्थानिक पातळीवरील विविध जनसमस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली, तसेच पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत मुख्यत्वे ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ उपक्रम आणि बूथ लेव्हल एजंट्स च्या कामांवर विशेष भर देण्यात आला. मतदार यादीतून चुकीची किंवा दुबार नावे वगळणे, नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे आणि आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. “सशक्त संघटना आणि पारदर्शक लोकशाही निर्माण करण्यासाठी सर्वांनी पूर्ण जबाबदारीने आणि ताकदीने काम करावे,” असे आवाहनही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याप्रसंगी केले.
या बैठकीला चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, विनोद अहिरकर, तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, शहराध्यक्ष शेरकी सर, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, माजी जिल्हा परिषद सदस्या देवेंद्र आर्या, भास्कर माकोडे, नगरसेवक राहुल चौधरी, सरपंच रोहिणीताई नैनाम, प्रवीण पिदुरकर, विनोदभाऊ थेटे, वसंत पोटे, राकेश नैनाम, सोमेश्वर कुंघेजवार, मुरलीधर टेकाम, मंगेश उपरे, ऋषी पोलेलवार, अनिल पाल, मडावी सर, प्रशांत बुधरण, दिवू रणदिवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






