चंद्रपूर दुकानात चोरी झालेल्या सीबीसी मॉल परिसरातील वाईन शॉपीचे शटर

सीसीटीव्हीत कैद झाला चोरटा, चंद्रपुरात वाईन शॉपीत चोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 14, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर दुकानात चोरी झाल्याची घटना नागपूर रोडवरील सीबीसी मॉल परिसरात समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने वाईन शॉपीचे शटर तोडून सुमारे ६५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चोरट्यांनी आता थेट दुकानांना लक्ष केंद्रित केल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर शहरातील नागपूर रोडवरील सीबीसी मॉल परिसरातील ‘मनोहर वाईन शॉपी’चे शटर तोडून अज्ञात चोराने काऊंटरमधील सुमारे ६५ हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. (चंद्रपुरात उच्चशिक्षित महिलेची फसवणूक, वाचा हि बातमी)

चंद्रपूर दुकानात चोरी: सीबीसी मॉल परिसरातील वाईन शॉपीत घटना

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार सविन संजय बेरडे (वय ४१, रा. बालाजी वार्ड, चंद्रपूर) यांचे नागपूर रोडवरील वडगाव येथील सीबीसी मॉलमध्ये ‘मनोहर वाईन शॉपी’ नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजता दुकान बंद करताना त्यांनी दिवसाच्या व्यवहारातील १ लाख ४४ हजार रुपये स्वतःजवळ ठेवले, तर उरलेली चिल्लर व किरकोळ रक्कम अशी अंदाजे ६५ हजार रुपयांची रोकड (ज्यात ५ रुपयांचे नाणी, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता) दुकानातील काऊंटरमध्ये ठेवून शटरला कुलूप लावले व ते घरी निघून गेले.

दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता दुकानातील कर्मचारी जितेंद्र गणवीर यांनी फिर्यादी सविन बेरडे यांना फोन करून दुकानाचे कुलूप तुटलेले असून शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर बेरडे यांनी आपल्या मित्रासह तातडीने दुकानाची गाठ घेतली. दुकानात जाऊन तपासणी केली असता, काऊंटरमध्ये ठेवलेले ५ रुपयांचे कॉईन, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा असे एकूण ६५ हजार रुपयांचे चलन गायब असल्याचे स्पष्ट झाले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका अनोळखी इसमाने रात्रीच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केल्याचे आणि चोरी करून पसार झाल्याचे दिसून आले.

या प्रकरणी दुकानमालक सविन बेरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५(ए) आणि ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा प्रल्हाद दरडे हे करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment