Criminal Parade Chandrapur अंतर्गत चंद्रपूर पोलिसांनी जामिनावरील गुन्हेगारांची ओळख परेड घेताना दिसत आहेत.

Criminal Parade Chandrapur | चंद्रपुरात २७० जामिनावरील गुन्हेगारांची पोलिसांकडून परेड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 19, 2026

Criminal Parade Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढले आहे, या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी प्रयोग करीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७० जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांची परेड घेतली, जामिन्याच्या अटीचा भंग करू नका अन्यथा कठोर कारवाई केल्या जाणार असा इशारा पोलीस अधीक्षक नोपानी यांनी दिला आहे. (चंद्रपुरात २ किलो डोडा पावडर जप्त)

चंद्रपूर जिल्ह्यातील जामिनावरील गुन्हेगारांची पोलिसांकडून ओळख Criminal Parade Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जामिनावर बाहेर असलेल्या एकूण २७० सराईत गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक नोपानी यांच्या उपस्थितीत ओळख परेड घेण्यात आली.

उपस्थित गुन्हेगारांना जामिनीच्या अटी व शर्थीचे पालन करावे, अन्यथा पोलीस न्यायालयात धाव घेत तुमची जामीन रद्द करणार असा इशारा यावेळी देण्यात आला. परेड दरम्यान ज्या गुन्हेगारांवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई झाली नाही त्यांची यादी तयार करीत तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम ठाणे प्रमुखांना सूचना देण्यात आल्या, रेकॉर्डवरील गुन्हेगार पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय होणार नाही याकडे लक्ष ठेवावे. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कसलीही तडजोड केल्या जाणार नाही, कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर MPDA व तडीपारीची कारवाई करण्यात येणार असा गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक नोपानी यांनी इशारा दिला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment