गडचांदूर ट्रॉली चोरी प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ट्रॅक्टर ट्रॉली

गडचांदूरमधील ट्रॉली चोरीचा उलगडा: यवतमाळच्या दोघांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 9, 2026

गडचांदूर : गडचांदूर ट्रॉली चोरी प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गडचांदूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने ही कारवाई केली. मौजा आसन येथून ३० सप्टेंबर २०२६ रोजी एक ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली होती. याबाबत पुरुषोत्तम ढेंगळे यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी चोरीची ७० हजारांची ट्रॉली जप्त केली. गुन्ह्यात वापरलेला ५ लाखांचा ट्रॅक्टरही ताब्यात घेतला. एकूण ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. (पगार मागितला कि खंडणी? दोन बाजू समोर, वाचा हि बातमी)

गडचांदूर ट्रॉली चोरी: तक्रार आणि गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा आसन येथील रहिवासी पुरुषोत्तम भाऊराव ढेंगळे यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांची एन.के. कंपनीची ट्रॅक्टरची ट्रॉली (क्र. एम.एच. ३४ सी.आर. ४६०३) मौजा आसन येथून अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी अप.क्र. ४८९/२६ कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

डी.बी. पथकाचा तपास आणि आरोपींना अटक

सदर गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना गडचांदूर डी.बी. पथकाला गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे महत्त्वाचा सुगावा मिळाला. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून प्रणय विजय जिवणे (वय २६ वर्षे, रा. घोन्सा, ता. वणी, जि. यवतमाळ) आणि रज निकांत बालाजी वल्लरवार (वय ३६ वर्षे, रा. रासा, ता. वणी, जि. यवतमाळ) या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता, त्यांनी मौजा आसन (खुर्द) येथून सदर ट्रॅक्टर ट्रॉली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींकडून ७० हजार रुपये किमतीची एन.के. कंपनीची चोरी झालेली ट्रॉली आणि चोरीसाठी वापरलेला युवो टेक कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २९ सी.जे. १७४९, कि. ५ लाख रुपये) असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सदर धडक व यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद बानबले, पोउपनि पंकज हेकाड, पोहवा शितल बोरकर, नापोअं बलवंत शर्मा, पो.अं. साईनाथ उपरे, पोअ सूरज आणि पोअ प्रकाश यांनी पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment