Gondpipri Arvi Gambling Raid लाठी पोलीस छापा जप्त मुद्देमाल

आर्वीत अवैध धंद्यांवर चाबूक! लाठी पोलिसांच्या धाडीने जुगारींचे धाबे दणाणले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 9, 2026

चंद्रपूर: Gondpipri Arvi Gambling Raid गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजा आर्वी येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषद शाळेमागील एका गोठ्यात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ७ जणांना जागीच ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. (हे हि वाचा – जंगलात जुगार, पोलिसांची धाड, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त)

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लाठी पोलिसांना खबर मिळाली होती की, आर्वी येथील जिल्हा परिषद शाळेमागे असलेल्या शंकर निखाडे यांच्या गोठ्या जवळ काही इसम मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत आहेत. या बातमीच्या आधारे लाठी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने आणि पंच साक्षीदारांनी मिळून घटनास्थळी अचानक धाड टाकली. पोलिसांनी तात्काळ घेराव घालून जुगार खेळणाऱ्या ७ जणांना जागीच पकडले.

या कारवाईत पोलिसांनी राहुल अंबादास खोब्रागडे (वय ४०, रा. तोहगाव), सचिन दामोधर मोरे (वय ३४, रा. आर्वी), बाळकीसन खुशाल जेऊरकर (वय ४१, रा. आर्वी), प्रकाश महादेव आत्राम (वय ३०, रा. आर्वी), ताराचंद प्रभाकर अलोणे (वय ५९, रा. आर्वी), संतोष मारोती मडावी (वय ४६, रा. आर्वी) आणि दशवंत धोंडूजी जीवतोडे (वय ५९, रा. आर्वी) या सर्व सात जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २,२२० रुपये रोख रक्कम, ५२ ताश पत्ते, २ रुपयांची पेन आणि २१,००० रुपये किमतीचे एकूण ४ मोबाईल फोन असा २३,२७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लाठी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ५३/२०२६ नुसार कलम १२ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते, पोलीस हवालदार अशोक मंजुळकर, पोलीस अंमलदार चेतन झाडे, विलास जाधव, कुणाल पुसाम आणि महिला पोलीस अंमलदार अनुराधा काळे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment