चंद्रपूर: Chandrapur Lavani Guinness Record चंद्रपुरात ५ हजार महिला व मुलींनी एकत्र येत एकाच तालावर लावणी नृत्य सादर करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित केला होता. या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला, विद्यार्थिनी आणि शाळांचा सन्मान सोहळा पार पडला. चांदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा प्रमाणपत्र वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या जागतिक कामगिरीमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक सांस्कृतिक पटलावर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. (हे हि वाचा – ११७ कामगारांच्या घरात आनंद)
दिग्गज मान्यवरांच्या हस्ते कोरिओग्राफर्स आणि संस्थांचा सन्मान
या ऐतिहासिक जागतिक विक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या महिला, विद्यार्थिनी, शाळा-महाविद्यालये, शिक्षक, कोरिओग्राफर्स, प्रशिक्षक, विविध संस्था आणि सहकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी चांदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात भव्य सन्मान व प्रमाणपत्र वितरण सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला सामाजिक व विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये श्रीमती सुषमाताई शिंदे, उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा सौ. छबूताई वैरागडे, रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, डॉ. अशोक जीवतोडे, दीपकजी जयस्वाल, जयंतजी मामीडवार, रामजी धनमने, बिरजूभाऊ पाझारे, अभयजी बुटले, माजी नगरसेविका वनश्री मेश्राम आणि एफ.ई. गर्ल्स कॉलेजच्या प्राचार्या गीता महेशकर यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
यावेळी बोलताना मान्यवरांनी उत्कृष्ट महिला मंचाच्या या धाडसी व भव्य उपक्रमाचे कौतुक केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या कडक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या ज्युरी मेंबर्स आणि सर्व कोरिओग्राफर्सच्या विशेष योगदानाचाही या सोहळ्यात कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा छबूताई वैरागडे यांचा खंबीर पुढाकार
कोअर कमिटी आणि स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान या भव्य उपक्रमाची आखणी आणि व्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले. या ऐतिहासिक यशामागे उत्कृष्ट महिला मंचाच्या कोअर कमिटीतील सागर अदणकर, साक्षी कार्लेकर, सोनाली धनमने, मेघा अदणकर, मनीषा भाके, योगीता धनेवार, वंदना राधारपवार, अर्चना चहारे, पूजा पडोळे, प्रीती बल्लावार, स्नेहल बांगडे, प्रिया खनके, करिना वांढरे, अभिलाषा मेंदडकर, प्रीती लखदिवे, वैशाली भागवत, सुवर्णा बेज्जलवार, आरती वर्मा, परेश गहूकर, विवेक तोहगावकर, मयूर टेकाम, वंदना मुंनघाटे, उषा भोयर, ज्योती एकोणकर यांच्यासह असंख्य सहकारी व स्वयंसेवकांचे अहोरात्र कष्ट आणि मोलाचे योगदान राहिले.
उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक चांदा बँक सभागृहात पार पडलेल्या या शानदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली धनमने यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी या जागतिक विक्रमाचा प्रवास आणि त्यामागील भूमिका विषद केली. तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिल्पा कोंडावार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
चंद्रपूरच्या नारीशक्तीची जगभरात नोंद “५,००० महिला… एक ताल… एक लावणी… आणि एक ऐतिहासिक जागतिक विक्रम!” या स्लोगनची प्रचिती देत चंद्रपूरच्या महिला व मुलींनी आपल्या अफाट सामर्थ्याची, एकजुटीची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची जगभरात सुवर्ण अक्षरांनी नोंद केली आहे. या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने सहभागी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






