ब्रम्हपुरी: Bramhapuri Gambling Raid प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत कटपत्ता जुगार खेळणाऱ्या ८ जणांना रंगेहाथ पकडले आहे. शहरालगतच्या मौजा खंडाळा परिसरात एका घरासमोरील मोकळ्या जागेत हा जुगार सुरू होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रकमेसह ५२ पत्त्यांचे जुगार साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – वरोऱ्यात बकरे चोरणारी टोळी सक्रिय, पोलिसांनी केली कारवाई)
Bramhapuri Gambling Raid : खंडाळा परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
शहरालगत असलेल्या मौजा खंडाळा परिसरात उघड्या जागेत सुरू असलेल्या कटपत्ता जुगार अड्ड्यावर ब्रम्हपुरी पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्रनाथ मंडल व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार परमेश्वर नागरगोजे, नरेंद्र चैरागडे, प्रमोद टिकले आणि प्रकाश मसराम हे परिसरामध्ये गस्त घालत होते. या दरम्यान मौजा खंडाळा येथील वनिता दिवाकर राखडे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत विजेच्या उजेडात काही इसम ५२ तासांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून ‘कटपत्ता’ नावाचा हार-जीतचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी लपत-छपत धाड टाकली. त्यावेळी त्या ठिकाणी काही इसम पैशांची बाजी लावून जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पंकज विजय भोयर (वय २८, रा. धुमनखेडा), अमर शंकर राउत (वय ३१, रा. धुमनखेडा), यश नितीन चिनेवार (वय २२, रा. देलनवाडी), सरफराज रियाज शेख (वय २२, रा. भवानी वार्ड), सागर राजु कुथे (वय २७, रा. टिळकनगर), प्रसंजित प्रशांत विश्वास (वय २७, रा. फुकटनगर बंगाली कॅम्प, चंद्रपूर), मयुर मिलींद वाल्दे (वय २३, रा. गुजरी वार्ड) आणि प्रणय प्रदिप अलगदिवे (वय २८, रा. भवानी वार्ड, ब्रम्हपुरी) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या अंगझडतीत आरोपींकडून रोख २,१७० रुपये आणि जुगाराच्या डावावर लावलेले ४०० रुपये, अशी एकूण २,५७० रुपयांची रोकड तसेच ५० रुपये किमतीचे ५२ तासांचे पत्ते असा एकूण २,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्रनाथ मंडल यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज शेलोकार करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






