Gondpipri Waras Nond Process Restarted MP Pratibha Dhanorkar

गोंडपिपरी एमआयडीसी भागात अखेर रखडलेली वारस नोंद प्रक्रिया सुरू; खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 25, 2026

चंद्रपूर : Gondpipri Waras Nond प्रक्रिया प्रशासनाकडून अखेर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे गोंडपिपरी एमआयडीसी परिसरातील रखडलेली महसुली कामे मार्गी लागतील. (हे हि वाचा – सिंदेवाहीत कांग्रेसचा जनआक्रोश मोर्चा)

शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, मयत व्यक्तींच्या जागेवर कायदेशीर वारसांची नोंद करण्यासाठी, जमिनीचे हक्क हस्तांतरित करण्यासाठी तसेच इतर विविध महसुली व प्रशासकीय कामांसाठी रखडलेली वारस नोंदणी प्रक्रिया अखेर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तातडीच्या पुढाकाराने पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. विशेषतः गोंडपिपरी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित भूसंपादन व इतर तांत्रिक कारणांमुळे ही वारस नोंदणीची कामे खोळंबली होती, ती आता प्रशासनाकडून मार्गी लावण्यात आली आहेत.

गेल्या काही काळापासून वारस नोंदणी बंद असल्याने गोंडपिपरी तालुक्यातील विशेषतः प्रस्तावित एमआयडीसी भागातील अनेक नागरिकांना, मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना व इतर सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवण्यात आणि जमिनीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासनाला यावर त्वरित मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, “शासकीय योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये आणि नागरिकांची कामे अडून राहू नयेत यासाठी वारस नोंदी तातडीने सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे,” अशी ठाम भूमिका घेतली.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या सूचनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी प्रशासनाने गोंडपिपरी एमआयडीसी प्रस्तावित गावांमधील रखडलेली वारस नोंदणी प्रक्रिया तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

वारस नोंदणी पूर्ववत सुरू झाल्यामुळे मयत व्यक्तींच्या वारसदारांसह क्षेत्रातील इतर सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या भागातील महसूल कार्यालयाशी संपर्क साधून वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन खासदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment