Madh Kendra Yojana Maharashtra training and subsidy details

मधमाशापालनावर ५०% अनुदान; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 21, 2026

चंद्रपूर – Madh Kendra Yojana Maharashtra अंतर्गत राज्यभरात अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे ही योजना राबवली जात आहे. इच्छुक शेतकरी आणि संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मध उद्योगासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जात आहे. तसेच लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देखील पुरवले जाईल. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती कडून/संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (पीक विमा योजना, ३१ जुलै पर्यंत करा अर्ज)

योजनेची वैशिष्टे : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वंगुतवणुक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती.

Madh Kendra Yojana Maharashtra ची प्रमुख वैशिष्ट्ये

1. वैयक्तीक मधपाळ : पात्रता अर्जदार स्वाक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे

2. केंद्रचालक प्रगतशिल मधपाळ : व्यक्ती पात्रता किमान 10 वी पास, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे, व्यक्ती चे नावे किमान किंवा त्या व्यक्ती च्या कुंटूबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती/जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलली शेत जमीन तसेच लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकाना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

3. केंद्र चालक संस्था पात्रता :  संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेचे नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य ईमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी

अटी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंद पत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

अधिक माहिती करीता संपर्क : जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडल, उद्योग भवन, दुसरा माळा, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर. मोबाईल क्रमांक : 9373287057/9322789232 , मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडल, शासकीय बंगला क्रं.7, महाबळेश्वर, जि. सातारा, पिन : 412806 दुरध्वनी : 02168 – 268264.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment