Maharana Pratap Chowk Chandrapur dispute Karni Sena statement

चंद्रपूरमध्ये महाराणा प्रताप चौकात दुसऱ्या पुतळ्यावरून वाद; करणी सेनेचा आंदोलनाचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 29, 2026

चंद्रपूर: Maharana Pratap Chowk Chandrapur येथे दुसरा पुतळा बसवून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा राजकीय कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केला आहे. याप्रकरणी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा करणी सेनेने दिला आहे. (हे हि वाचा – माझ्या अंगात देवी येते, पैसे दुप्पट करणार, महिलेची २५ लाखांनी फसवणूक)

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च २०१९ रोजी चंद्रपूर महानगरपालिकेच्या कायदेशीर मंजुरीने तत्कालीन अर्थ व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते या चौकाचे रीतसर उद्घाटन झाले होते. पूर्वइतिहास पाहता, आझाद बगीचा येथे वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांचा सुमारे ३५० किलोचा दगडी पुतळा स्थापित होता. तो पुतळा भग्न झाल्यानंतर नवीन पुतळा उभारण्याचे आश्वासन देत तत्कालीन नगरपालिकेने तो हलवला होता. मात्र, पालिका महानगरपालिकेत रूपांतरित झाल्यामुळे नवीन पुतळा उभारणीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. सध्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या परवानगीने या चौकाचे सौंदर्यीकरण सुरू असून, तेथे महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्याची मागणी राजपूत समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

राजकीय कट आणि दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा आरोप

दरम्यान, राजकीय दबावाखाली येऊन आणि स्थानिक मतदारांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या गैरउद्देशाने काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दोन समाजांत विनाकारण स्पर्धा लावून विवाद निर्माण करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणादरम्यान लावण्यात आलेला वाघाचा देखावा बाजूला करून त्याठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे करण्याच्या नावाखाली माजी मंत्र्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

राजपूत समाजाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांचा अवमान आणि सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला न बळी पडता या अर्जाचा सखोल विचार करावा आणि शांतता बिघडवणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. योग्य पावले न उचलल्यास राजपूत करणी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment