चंद्रपूर : Bhadrawati Krida Sankul Tender संदर्भात गंभीर आर्थिक अनियमिततेची तक्रार चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे. भद्रावती क्रीडा संकुलातील ४०० मीटर मातीची धावपट्टी स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी स्वखर्चाने तयार केली होती. (हे हि वाचा – शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना)
मात्र, त्याच कामासाठी क्रीडा विभागाने ८.९५ लाखांचे टेंडर काढून निधी उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भद्रावती क्रीडा संकुलातील ४०० मीटर मातीच्या धावपट्टीबाबत गंभीर आर्थिक अनियमिततेची तक्रार आज जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात आली.
नागरिकांनी स्वखर्चाने व श्रमदानातून तयार केली धावपट्टी
तक्रारीनुसार, भद्रावती क्रीडा संकुलातील ४०० मीटर मातीची धावपट्टी ही स्थानिक नागरिक, युवक व खेळाडूंनी स्वतःच्या पैशातून तसेच श्रमदानातून तयार केली होती. धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याच कामासाठी जिल्हा क्रीडा विभागामार्फत सुमारे ₹८.९५ लाखांचे टेंडर काढण्यात आले आणि त्या माध्यमातून शासनाच्या निधीची उचल करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
जर प्रत्यक्षात धावपट्टीचे काम नागरिकांनी स्वखर्चातून केले असेल, तर त्याच कामासाठी शासनाकडून निधी कसा खर्च करण्यात आला, टेंडर कोणत्या आधारावर काढण्यात आले आणि संबंधित बिले कोणाच्या मंजुरीने अदा करण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणातील सर्व टेंडर कागदपत्रे, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), बिले आणि निधी वितरणाची तपासणी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अविनाश पुंड तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
निवेदनात प्रशासनाला २१ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून अहवाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून, योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






