चिमूर (चंद्रपूर): Tiger Attack Chimur Chandrapur अंतर्गत येणाऱ्या मालेवाडा गावात आज दुपारी वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या दशरथ जीवतोडे यांच्यावर वाघाने अचानक झेप घेतली. स्थानिकांनी धाव घेतल्याने वाघ पळून गेला. जखमी गुराख्यावर चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वाघाची मोठी दहशत पसरली आहे. (हे हि वाचा – वाघाचा हल्ला, एक ठार)
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ जीवतोडे हे नेहमीप्रमाणे गावाजवळील जंगल परिसरात आपली गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या इतर नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तातडीने त्या दिशेने धाव घेतली. लोकांचा वाढता गोंधळ पाहून वाघाने तिथून जंगलाच्या दाट झाडीत पळ काढला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दशरथ जीवतोडे यांना उपस्थितांनी त्वरित चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली आहे. या घटनेमुळे मालेवाडा व लगतच्या ग्रामीण भागात वाघाची मोठी दहशत पसरली आहे. जंगल परिसरात जाणाऱ्या शेतकरी व नागरिकांनी योग्य ती काळजी व खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






