मूल (चंद्रपूर): मूल वाघाचा हल्ला चिचाळा येथील जंगलात झाला असून त्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला आहे. मारोती उद्धव कोठारे (५०) असे जखमीचे नाव आहे. ते गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. दुपारी सुमारे २ वाजता वाघाने अचानक हल्ला केला. सोबतच्या इतर गुराख्यांनी धाव घेतली आणि आरडाओरड करून वाघाला पळवून लावले. जखमीला मूल उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. (महिलेवर वाघाचा हल्ला, वाचा बातमी)
मूल वाघाचा हल्ला : चिचाळा जंगलात काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, मारोती उद्धव कोठारे हे दररोजप्रमाणे जंगलामध्ये गुरे राखण्यासाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक एका वाघाने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केला. वाघ आणि गुराखी यांच्यात झुंज सुरू असतानाच, घटनास्थळी असलेल्या इतर गुराख्यांनी तातडीने धाव घेतली आणि जोरदार आरडाओरड करून वाघाला तेथून पळवून लावले. या अचानक झालेल्या हल्ल्यात मारोती कोठारे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी प्रथम मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता वनविभागाच्या वाहनाने त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती समजताच शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार यांनी मूल उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहत जखमी गुराखी व त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली.
यावेळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष चिचापल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, जखमी गुराखी मारोती कोठारे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना वनविभागामार्फत जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी प्रशांत गट्टुवार व उपस्थितांच्या वतीने करण्यात आली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






