मुंबई: Maharashtra Shasan GR NIFT Mumbai संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या पायाभूत व शैक्षणिक सुविधांना मोठी गती मिळणार आहे.
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT), मुंबई कॅम्पसच्या शैक्षणिक, आर्थिक व पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय सल्लागार समिती’ (SLAC) गठीत करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, २४ ऑगस्ट रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. (हे हि वाचा – इंद्रायणी माळ चे स्वरूप पालटणार)
या ६ सदस्यीय समितीत राज्याचे मुख्य सचिव अध्यक्ष असतील. त्यांच्यासह वित्त किंवा उद्योग विभागाचे सचिव, निफ्टचे महासंचालक, मुंबई कॅम्पस संचालक, तसेच शिक्षण व उद्योग क्षेत्रातील नामनिर्देशित प्रतिनिधींचा समावेश असेल.
शासन निर्णय प्रत डाउनलोड कराही समिती निफ्ट मुंबई कॅम्पसच्या उभारणीसाठी लागणारा निधी, विकासकामे, शैक्षणिक दर्जा आणि उद्योग क्षेत्राशी थेट समन्वय यावर देखरेख ठेवणार आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार असून, दर तीन महिन्यांनी किमान एक बैठक आयोजित केली जाईल. अशासकीय सदस्यांचा खर्च निफ्ट संस्थेच्या स्वनिधीतून केला जाणार असून राज्य सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now

