चंद्रपूर/:- महावितरण सेवा सेतू अभियान अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य महोत्सव संकल्पनेनुसार हे अभियान १७ ऑक्टोबरपर्यंत राबवले जात आहे. (चंद्रपूर शहरात रोज रस्ता होतो गायब, वाचा हि महत्वाची बातमी)
सौर योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. या कक्षांत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण सेवा सेतू अभियान: प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष
महाराष्ट्र शासनाच्या राज्य महोत्सव संकल्पनेला साजेसा व उत्साही प्रतिसाद देत महावितरणतर्फे प्रत्येक तालुक्यात व महावितरण उपविभाअंतर्गत विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर पर्यंत ‘सेवा सेतू व सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. सौर योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.
स्मार्ट सोलर योजना: श्रेणीनिहाय किती खर्च?
वीज ग्राहकांचे वार्षिक विद्युत वापर सरासरी प्रति महिना 100 युनिट पर्यंत असलेल्या ग्राहकांना १ किलोवॅट क्षमतेचा स्मार्ट सोलर योजना राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ३० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल (BPL) असलेल्या ग्राहकांसाठी फक्त अडीच हजार रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील ग्राहकांसाठी केवळ पाच हजार रुपये, तर इतर मागासवर्गीय व सर्व साधारण प्रवर्गासाठी दहा हजार रुपये आकारण्यात येईल.
स्मार्ट योजनेअंतर्गत वरोरा विभागात एकूण पाच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सेवा संकल्प अभियान अंतर्गत प्रत्येक तालुक्यात व महावितरण उपविभाअंतर्गत विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटाप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत सेवा सेतू अभियानांतर्गत माहिती घेऊन नोंदणी करावी व त्रुटीची पूर्तता करून प्रलंबित अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






