Mahavitaran Smart Meter मुळे वीजबिलात पारदर्शकता आणि ग्राहकांना सवलती

महाराष्ट्रात 1.20 कोटी स्मार्ट मीटर बसले; वीजबिल तक्रारी कमी, ग्राहकांना मिळत आहेत विशेष सवलती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 15, 2026

चंद्रपूर – Mahavitaran Smart Meter योजनेमुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना अनेक फायदे मिळत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 20 लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यामुळे वीज वापराचे अचूक रिडिंग मिळत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलातील तक्रारी कमी झाल्या असून ग्राहकांना मोबाईल ॲपवर तासागणिक वीज वापराची माहिती मिळत आहे. तसेच विविध सवलतींचाही लाभ दिला जात आहे. (स्मार्ट मीटरवरून संतापाची लाट)

राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडिंग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.

Mahavitaran Smart Meter मुळे ग्राहकांना कोणते फायदे मिळत आहेत?

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे दर तासाला त्याचा वीज वापर मोबाईल फोनवर समजतो. त्यामुळे वीजबिलाबाबत पारदर्शिता राहते. स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहकाला त्याच्या वीजवापरावर व वीजबिलावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.

स्मार्ट मीटरच्या ॲपद्वारे ग्राहकाला त्या घरात अथवा कार्यालयात अर्थिंगची समस्या अथवा वीजगळती होत असल्यास समजते. त्या माहितीचाही ग्राहकाला लाभ होतो.

ग्राहकाने कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे स्मार्ट मीटरमुळे समजते. त्या आधारे घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत मिळते. याशिवाय मोबाईल ॲपद्वारे बिल भरल्यास डिजिटल पेमेंटची सवलत आणि गो ग्रीनची दरमहा दहा रुपये सवलत मिळते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment