Misleading Drug Ads प्रकरणी चंद्रपूर FDA ची पतंजली मेगा स्टोअरवर कारवाई

Misleading Drug Ads चंद्रपूरच्या पतंजली मेगा स्टोअरमधून औषधसाठा जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 4, 2026

चंद्रपूर – Misleading Drug Ads प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील पतंजली मेगा स्टोअरवर धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान मधुमेह, लठ्ठपणा, दमा, हृदयरोग आणि ताप यांसारख्या गंभीर आजारांवर उपचाराचे दिशाभूल करणारे दावे करणारी आयुर्वेदिक औषधे आढळली. प्रशासनाने 45 हजार 970 रुपयांचा औषधसाठा जप्त केला असून काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. नागरिकांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन FDA ने केले आहे. (शेतमाल खरेदी-विक्रीसाठी परवाना आवश्यक, अन्यथा कारवाई)

Misleading Drug Ads प्रकरण नेमके काय?

जटपुरा गेट परिसरातील पतंजली मेगा स्टोअरची तपासणी केली असता मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, दमा, ताप व वजन कमी करण्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे दावे असलेली 16 आयुर्वेदिक औषधे आढळून आली. यापैकी तीन औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला.

संबंधित औषधांवर कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय गंभीर आजार बरे करण्याचे दावे करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या जाहिराती व औषध विक्री हा कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment