Nepal Flood Tourist Alert - नेपाळ पुरात अडकलेल्या पर्यटकांसाठी चंद्रपूर प्रशासनाची मदत लिंक

नेपाळमध्ये भीषण पूर; चंद्रपूरचे पर्यटक अडकले का?, जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाची मदत लिंक जारी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 26, 2026

चंद्रपूर – Nepal Flood Tourist Alert जारी करण्यात आला असून नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला भीषण पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रसुवा जिल्ह्यात अनेक पर्यटक अडकले आहेत. अडकलेल्या पर्यटकांना तातडीने मदत मिळावी म्हणून प्रशासनाने विशेष यंत्रणा उभारली आहे. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने माहिती नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक जारी केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदी साधणार संवाद)

चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी नागरिकांना त्वरित माहिती नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत.
या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:

🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन –

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वसूमना पंत यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment