चंद्रपूर – BJP SIR Abhiyan Chandrapur मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने विधानसभा कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. (हे हि वाचा – नेपाळ पूर संकट, चंद्रपुरातील पर्यटकांसाठी प्रशासनाने केली आपत्कालीन लिंक जारी)
संघटनेची ताकद कार्यकर्त्यांच्या समर्पणात असल्याचे सांगत त्यांनी मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.
BJP SIR Abhiyan Chandrapur : भाजप कार्यशाळेत प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन
एसआयआर मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे समर्पण, योग्य नियोजन आणि संघटनात्मक योगदान अत्यंत मोलाचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडत समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने बुधवारी आयोजित एसआयआर विधानसभा कार्यशाळेत आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत एसआयआर मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी एसआरआय महाराष्ट्र प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश तथा आमदार भगवानदास सबनानी, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रभारी तथा आमदार चौनसुखजी संचेती, भाजपचे जेष्ठ नेते विजय राऊत, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार सोम, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनोज पाल, नामदेव डाहुले, श्याम कनकम, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख दशरथ सिंह ठाकूर, अनिल फुलझेले, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, प्रदीप किरमे, रवी जोगी, सारिका संदूरकर, सुभाष आदमने, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, नगरसेवक आशीष मासीरकर, सविता कांबळे, सुमित बेले, आदिंची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांचे समर्पण हीच मोहिमेची खरी ताकद: आ. किशोर जोरगेवार
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोणतीही मोहीम यशस्वी करण्यामागे कार्यकर्त्यांची मेहनत, समर्पण आणि संघटित प्रयत्नांची मोठी भूमिका असते. एसआयआर मोहिमेतही प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे सहभागी होत दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पूर्ण करावी. संघटनेची ताकद ही कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे असे ते यावेळी म्हणाले.
एसआयआर महाराष्ट्र प्रभारी भगवानदास आमदार सबनाणी यांनी एसआयआर मोहिमेची उद्दिष्टे आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बूथस्तरापर्यंत मोहिमेची अचूक माहिती पोहोचवून प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, तसेच नागरिकांशी संवाद साधत मोहिमेला व्यापक स्वरूप द्यावे, असे त्यांनी सांगितले.
आमदार चौनसुख संचेती यांनीही कार्यकर्त्यांनी संघटनात्मक शिस्त आणि समन्वय राखत एसआयआरचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांची सक्रियता आणि बूथस्तरावरील नियोजन हेच मोहिमेच्या यशाचे प्रमुख आधार आहेत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचा आढावा घेत नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास एसआयआर मोहीम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी एसआयआर मोहिमेच्या कामकाजाचे नियोजन, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासोबतच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यशाळेला भाजपचे पदाधिकारी, एसआयआरचे विधानसभा व बूथस्तरीय प्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






