बापरे! चंद्रपुरात पाईपलाईन टाकताना नियमांना केराची टोपली; भ्रष्टाचाराचा 'अमृत' घोळ उघड

March 14, 2026 by Prakash Hande

Amrut Yojana : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत सुरु असलेल्या अमृत 2 योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता जल प्राधिकरण व लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे करण्यात आली असून आज 13 मार्चला मनपा आयुक्त अकनूरी नरेश यांनी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या तक्रारीची पडताळणी करीत अधिकारी व कंत्राटदाराची चांगलीच कानउघाडणी केली.
चंद्रपूर शहरात 129 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे, मात्र या कामात मोठया प्रमाणात अनियमितता होत आहे. (चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलणार, रिंग रोड बाबत मुनगंटीवारांचा पाठपुरावा)

 

पाईप जमिनीत टाकण्यासाठी वर्क ऑर्डर प्रमाणे 3 फूट खोल खड्ड्यात पाईप टाकणे अनिवार्य असताना कंत्राटदार तर्फे केवळ 1 फुटाचा खड्डा करीत त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले.


यावर सहारे यांनी महाराष्ट्र जलप्राधिकरणला डिसेम्बर 2025 मध्ये निवेदन देत कामाच्या अनियमिततेवर लक्ष वेधले मात्र त्या निवेदनाची साधी दखलही घेण्यात आली नाही. 
अमृत च्या कामाचा घोळ वाढत असल्याने चंद्रपूर मनपाला निवेदन व दोनवेळा स्मरणपत्र देण्यात आले. मनपा आयुक्त अकनूरी नरेश यांनी निवेदनाची दखल घेत 13 मार्चला सकाळी इंदिरानगर व बंगाली कॅम्प प्रभागात प्रत्यक्षरित्या आयुक्त अकनूरी नरेश यांनी पाहणी केली. 


कामातील घोळ त्यांनी प्रत्यक्ष बघितल्याने जल प्राधिकरणचे अधिकारी व लक्ष्मी कन्ट्रक्शन चे प्रोजेक्ट व्यवस्थापक यांची चांगलीच कानउघाडणी केली. कामात घोळ चालणार नाही, शहरातील अमृत योजनेची काम व्यवस्थितपणे व्हायला हवी अशी समज अधिकाऱ्यांना दिली. Water Pipeline


नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणार यासाठी हि योजना सुरु करण्यात आली मात्र अधिकारी यांच्यातर्फे कामात अनियमितता होत असल्याने जलप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे व कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केली आहे.

Leave a Comment

+