Chandrapur Drugs Raid - चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थावर चाप लावीत 20 मार्चला सापळा रचत तब्बल 55.09 ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. यावेळी एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (3 हजार 717 कोटींचा महाघोटाळा)
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची आवक वाढली आहे, अनेक छुप्या मार्गाने नशेचं सामान जिल्ह्यात येत आहे. यावर कारवाई व्हावी करिता चंद्रपूर पोलीस प्रयत्नशील आहे.
शहरात एक युवक मफेड्रोन पावडर घेऊन येत असल्याची माहिती 20 मार्चला स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे जलनगर वॉर्ड परिसरात पोलिसांनी सापळा रचला, त्यावेळी दुचाकीवर एक संशयास्पद युवक आला असता, त्याची झडती घेण्यात आली.
झडती दरम्यान 36 वर्षीय माधव नारायण मामीड जवळ 55.09 ग्रॅम एमडी पावडर आढळून आले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH34 BN4861 सह एमडी असा एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मामीड वर NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. Local Crime Branch
सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत, दीपक डोंगरे, इम्रान, सचिन गुरनुले, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, किशोर वाकाटे व अजित शेंडे यांनी केली.
Leave a Comment