Chandrapur Ganja Seized : चंद्रपूर - चंद्रपुरात दुसऱ्या राज्यातून गांजाची खेप येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीला अटक करीत तब्बल ८ किलो गांजा जप्त केला, यावेळी पोलिसांनी एकूण २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीवर NDPS अधिनियम अन्व्ये कलम ८ (क), २० (ब) (ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (चंद्रपूर शहरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली, गस्त वाढवा)
चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीचे मुख्य कारण हे व्यसन आहे, दारू सह आता गुन्हेगारी प्रवृत्ती गुन्हा करण्यासाठी अंमली पदार्थचे सेवन करीत आहे यावर आळा बसावा याकरिता चंद्रपूर पोलीस दल प्रयत्नरत आहे. २२ एप्रिलच्या मध्यरात्री पोलिसांना गांजा बाबत माहिती मिळाली होती.
गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील कुंदन प्लाझा चौकात नाकाबंदी केली, मध्यरात्री २ वाजता वर्णनाप्रमाणे एक इसम संशयास्पद पद्धतीने येताना दिसला, सदर इसम हा प्लस्टिक पिशवी घेऊन येत होता, पोलिसांनी त्याला थांबवित झडती घेतली असता त्या पिशवीत ८.०१५ किलोग्रॅम ओला गांजा, पाने, फुले व बियांसह आढळून आला.
५३ वर्षीय शहादेव ठाकूरदास मलिक राहणार ठाकूरनगर, तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली, हल्ली मुक्काम राष्ट्रवादी नगर चंद्रपूर जवळून गांजासह मोबाईल फोन आढळून आला, आरोपी मलिक ने सदर गांजा हा ओडिसा राज्यातून आणला असल्याची कबुली दिली.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यत्तांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.
Leave a Comment