Chandrapur IPL Betting : चंद्रपूर - IPL सुरु झाल्यावर जिल्ह्यातील सट्टेबाजांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरु होतो, क्रिकेटच्या या महासंग्रामाच्या २ महिन्याच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, देशात जुगार म्हणजेच सट्टा लावण्यावर प्रतिबंध असला तरी हे आजीही प्रत्येक शहरातील कानाकोपऱ्यात निर्भीडपणे खेळल्या जातो. चंद्रपूर जिल्ह्यातही तीच अवस्था आहे. सट्टेबाज खुलेआम सट्टा खेळत आहे मात्र त्यांचेवर कारवाई हि नाममात्र होते. (चंद्रपुरात ८ किलो गांजा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई)
२२ एप्रिल रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यादरम्यान ऑनलाईन सट्टा घेणाऱ्याला अटक केली, आरोपीजवळून २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना रयतवारी कॉलोरी रोडवरील दूध डेअरीजवळ एक तरुण ऑनलाईन मोबाईलद्वारे सट्टा घेत होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, २४ वर्षीय प्रणय व्यंकटेश चिलकमवार राहणार अहेरी जिल्हा गडचिरोली याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये nice७७७७ नावाच्या बेकायदेशीर वेबसाईटवर आयडी हार-जीत पैसे लावत सट्टा खेळत होता.
प्रणय ला ऑनलाईन आयडी इरफान शेख राहणार अहेरी याने पुरवली असल्याची माहिती मिळाली, दोघांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यावेळी ऑनलाईन सट्ट्याचे स्क्रिनशॉट व व्यवहाराच्या प्रति सह १ मोबाईल असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सट्टा खेळल्या जातो, या दोन महिन्याच्या कालावधीत सट्टा घेणारे आणि खेळणाऱ्याला आयडी देणारे डबेवाले दुसऱ्या गावात, लॉज, हॉटेल्स व फार्म हाऊस मध्ये जाऊन आपला धंदा सुरळीत चालवितात. विशेष म्हणजे या कालावधीत सट्टा खेळणारे पोलिसांच्या तावडीत मिळतात मात्र डबेवाले हे त्यांच्या आवाक्याबाहेर असतात. चंद्रपूर शहरात अनेक नावाजलेले नाव या व्यवसायात गुंतलेले आहे. Lucknow Vs Rajasthan
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.
Leave a Comment