Chandraipur Mahila Andolan : चंद्रपूर - नारीशक्ती वंदन विधेयक 2023 मध्येच पारित होऊनही भाजप सरकार केवळ 'डी-लिमिटेशन आणि जनगणनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करत आहे. महिलांना खरोखरच न्याय द्यायचा असेल, तर कोणतीही अट न ठेवता आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी.याकरिता भाजपच्या अश्या दिशाहीन धोरणाविरोधात आणि काँग्रेस पक्षाने संसदेत घेतलेल्या खंबीर भूमिकेचे समर्थन करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड कुंदाताई जेणेकर,शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य आंदोलन करण्यात आले. (कार्यक्रमाला गालबोट तुम्ही लावला - अल्का आत्राम)
कांग्रेस पक्षाचे महिला आरक्षणाला समर्थन आहे मात्र त्याआडून भाजप डिलिमिटेशनचे विधेयक पास करू बघत आहे, कांग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारला आवाहन केले होते कि लोकसभेच्या आता जितक्या जागा आहे त्यामध्ये सरकारने ३३ टक्के आरक्षण द्यावे आज विधेयक आणा आम्ही समर्थन करू असे म्हटले होते. वर्ष २०२३ मध्ये नारीशक्ती वंदन विधेयक पास झाले होते, सरकारचे डिलिमिटेशन विधेयक पास न झाल्याने महिला आरक्षणाला कांग्रेसने विरोध केला असा कांगावा सरकार करीत आहे.
आंदोलनात भाजप सरकार चा खरपूस समाचार घेत तीव्र निदर्शने करण्यात आले. आंदोलनाला चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोषभाऊ लहामगे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता राजेश अडूर, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर,उपसभापती सहिदा शेख,रोशनलाल बिट्टू,प्रवीणभाऊ पडवेकर,राहुल चौधरी,नगरसेवक, बापू धोटे अश्विनी खोब्रागडे,अनुताई दहेगावकर,मीनाक्षी गुजरकर ,नरेंद्र बोबडे, राहुल घोटेकर नगरसेवक, सोफिया तंवनगर नगरसेविका, तालुका अध्यक्ष अनिल नरुले,गोपालजी अमृतकर,मनिषजी तिवारी,राज कुंद्रा,दर्शन बुरडकर मोनू रामटेके,मुन्नी बाजी,पायल दुर्गे,साधना रामटेके,सुवर्णा लोखंडे, दिक्षा सातपुते, प्रतिभा पेंदाम, आरती खनके,उषा तंगडपल्लीवार, कविता बावणे, उज्वला कार्लेवार, रेणुका तुरविले,नीता नवरखेडे, तारा खाडिलकर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Leave a Comment