Chandrapur LCB News : सिंदेवाही - सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जुगार अड्ड्यावर धाड मारत एकूण १२ इसमांवर कारवाई करीत २ लक्ष ७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (पोलिसांचे पथक बघताच तस्कर पळाले)
३ फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली कि सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५२ ताश पत्त्यावर हारजीत चा खेळ सुरु आहे, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने धाड मारली असता जुगार बहाद्दर है सैरावैरा पळू लागले, या प्रकरणी ३० वर्षीय सलीम चांद खान पठाण, ३१ वर्षीय दीपरत्न खोब्रागडे, ३२ वर्षीय जावेद कादरखान पठाण, अरुण नन्नावरे, संतोष नान्हे, पांडुरंग पुसतोडे, पुरुषोत्तम बांबोळे, प्रकाश आदे, सारंग निमगडे व जितेंद्र करकाडे यांना अटक करण्यात आली, तर निखिल राऊत एक दुचाकी चालक घटनस्थळावरून पसार झाला.
आरोपींची अंगझडती घेतली असता १९ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व ७ दुचाकी असा एकूण २ लक्ष ७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पसार आरोपींचा शोध घेणे सुरु असून सदर घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, अजित शेंडे, प्रदीप मडावी, नितेश महात्मे आणि गजानन मडावी यांनी केली.
Leave a Comment