Chandrapur Plot Patta । पट्टे वाटपासाठी आता स्वतंत्र विभाग! कागदपत्रे तयार ठेवा, प्रशासनाची मोठी तयारी!

April 20, 2026 by Prakash Hande

Chandrapur Plot Patta Distribution : चंद्रपूर - शहरातील नागरिकांना पट्टे वाटप प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढून पात्र नागरिकांना पट्टे वितरित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना दिले. (उशिरा पर्यंत शाळा भरते, माझ्याजवळ तक्रार करा - खासदार धानोरकर)

 

या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंतमहसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राममनपा आयुक्त अकनुरी नरेशतहसीलदार विजय पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारभाजप नेते प्रकाश देवतळेमहामंत्री रविंद्र गुरुनुलेश्याम कनकममनोज पालसविता दंडारेतुषार सोमबलराम डोडाणीनामदेव डाहुलेनगरसेवक संजय कंचर्लावारभालचंद्र दाणवजितेश कुळमेथेनितेश गवळी तसेच नगरसेविका सविता कांबळेआशा देशमुखअॅड. सारिका संदुरकरसरला कुळसंगेअनुजा तायडेशीतल गुरुनुलेपुष्पा उराडे, ज्योती जीवने, महामंत्री सायली येरणेकौसर खान आदींची उपस्थिती होती.

 

बैठकीत बोलताना आ. जोरगेवार यांनी ड्रोन सर्व्हे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देतज्या नागरिकांची कागदपत्रे पूर्ण झाली आहेत त्यांना तत्काळ पट्टे वाटप प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले. तसेच या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी करावी आणि त्रुटी आढळल्यास त्या तत्काळ दुरुस्त कराव्यातअसेही त्यांनी स्पष्ट केले.

 

याच बैठकीत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियोजनाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमृत कलश योजनेच्या संथ गतीबाबत आ. जोरगेवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

 

शहरातील प्रलंबित नळजोडण्यांचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. ज्या भागात नळजोडणी प्रलंबित आहेतेथे तात्काळ जोडणी करण्यात यावीतसेच ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाहीतेथे विशेष नळजोडणी करून समस्या सोडवावीअसे निर्देश देण्यात आले. महाकाली मंदिर परिसरातील घरांना तातडीने नळजोडणी देण्यावरही त्यांनी भर दिला.

 

याशिवाय लाड-पांगे समितीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पाच ठिकाणी भाजी मार्केट उभारण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. या बैठकीत प्रशासनाला विविध विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 
 

Leave a Comment

+