Gambling Raid Update : चंद्रपूर - पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या जुगारावर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारीत १३ जुगार बहाद्दरांना ताब्यात घेत एकूण १ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (घर गहाण ठेवलं, शेती विकली हाती आलं बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र)
१८ फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना फार्म हाऊसमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली, माहितीच्या आधारे साखरवाही मधील एका फार्म हाऊसवर धाड मारली, हे फार्महाउस गजानन मंदिर वॉर्ड निवासी गुरुबाज सिंग गोतरा यांच्या मालकीचे आहे. फार्म हाऊसमधील एका झाडाखाली काही इसम हे पैश्याची बाजी लावत हार जितचा जुगार खेळत होते.
पोलिसांनी १३ इसमांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील १ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर पडोली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
या जुगार बहाद्दरमध्ये ५८ वर्षीय गुरुबाजसिंग रणजितसिंग गोतरा राहणार गजानन मंदिर वॉर्ड, ५० वर्षीय प्रदीप दिनकर गंगमवार राहणार महाकाली वॉर्ड, ३० वर्षीय बबलू सलाम शेख राहणार बगड खिडकी, ४० वर्षीय पाशा ताजमेहर शेख अंचलेश्वर वॉर्ड, २६ वर्षीय सुमित भारत निखाडे महादेव मंदिर वॉर्ड बाबुपेठ, ५३ वर्षीय जीवन जगदीश सोनी पनवेल मुंबई, ४० वर्षीय सुनील मधुकर हांडे अंचलेश्वर वॉर्ड, ४३ वर्षीय रंजित जनार्धन कांबळे नेताजी चौक बाबुपेठ, राजू लिंगाजी गोवर्धन अंचलेश्वर वॉर्ड, ५५ वर्षीय संजय विठ्ठलराव गावंडे आझाद चौक तुकूम, ४६ वर्षीय जीवन यादव हांडे अंचलेश्वर वॉर्ड, २६ वर्षीय पुरनचंद कणयालाल बुटन समाधी वॉर्ड व ४६ वर्षीय आतिष जनार्धन पाटील अंचलेश्वर वॉर्ड यांचा समावेश आहे. Chandrapur Crime News
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.
Leave a Comment