Chimur Atrocity Case : चिमूर – परिचयाच्या महिलेला पैसे दिले, पैसे परत घेण्यासाठी पती-पत्नी गेले असता त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करी जातीवाचक शिवगाळी केल्याने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी अंतर्गत ५ जणांवर १२ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. (चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांची परेड)
खानगाव तालुका चिमूर मध्ये राहणारे ३७ वर्षीय पोलीस पाटील प्रदीप संतोष रामटेके यांनी आपल्या परिचयाची महिला ३२ वर्षीय भाग्यश्री प्रशांत बावणे राहणार क्रांतीनगर चिमूर यांना २ महिन्यांपूर्वी ७० हजार रुपये दिले होते. १२ मे रोजी भाग्यश्री चा भाऊ २२ वर्षीय नवनीत राजेंद्र कोसरे याला रामटेके यांनी फोन करीत आज मी पैसे, सोने व चांदी घ्यायला घरी येत आहो. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास प्रदीप रामटेके व त्यांची पत्नी अश्विनी रामटेके हे दोघे नवनीत कोसरे यांच्या घरी गेले, रामटेके यांनी पैसे, सोने व चांदी मागितली असता नवनीत यांनी लाकडी दांड्याने रामटेके यांना मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ देणे सुरु केले. Chimur Atrocity Case
चंद्रपूर जिल्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल Chimur Atrocity Case
नवनीत चे २ मित्र रामटेके यांना पकडून होते, नवनीत ची आई शोभा कोसरे, अश्विनी कोसरे यांनी रामटेके यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रदीप ची पत्नी पतीला वाचवायला मध्ये आली. तर तिला सुद्धा लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. मानेवर दांडा लागल्याने रामटेके बेशुद्ध खाली कोसळले, शुद्धीवर आल्यावर रामटेके दाम्पत्यांनी थेट चिमूर पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
पोलिसांनी प्रदीप रामटेके यांना चिमूर रुग्णालयात उपचारासाठी आणले. याप्रकरणी पोलिसांनी नवनीत राजेंद्र कोसरे, शोभा राजेंद्र कोसरे, अश्विनी राजेंद्र कोसरे इतर दोघांवर असे एकूण ५ जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
