जामणी जुगार अड्डा कारवाईत शेगाव पोलिसांनी जप्त केलेले ताशपत्ते, रोख रक्कम आणि दुचाकी

शेतशिवारात जुगार अड्ड्यावर शेगाव पोलिसांचा छापा; तिघांना अटक, ३ फरार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 7, 2026

चंद्रपूर / वरोरा (शेगाव): जामणी जुगार अड्डा कारवाईत शेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघे फरार झाले आहेत. शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामणी शेतशिवारात तलावाजवळ त्रिपालच्या झोपडीत जुगार सुरू होता. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोख १६०० रुपये, ५२ ताशपत्ते आणि पाच दुचाकी असा २ लाख ९१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (एसटी कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, वाचा हि बातमी)

जामणी जुगार अड्डा कारवाई : तलावाजवळ नेमके काय घडले?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे हे आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी वाहनाने गस्त घालत असताना, जामणी गावाच्या तलावाजवळ काही इसम त्रिपालची झोपडी बनवून ५२ ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची पक्की बातमी खबर्याकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचांना सोबत घेऊन दुपारच्या सुमारास घटनास्थळी लपत-छपत जाऊन छापा टाकला. (एटीएम कार्ड बदलवून वृद्धाची फसवणूक, वाचा व सावध रहा)

पोलिसांनी टाकेलेल्या या अचानक धाडीमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून महेश गोमाजी आवारी (वय २८, रा. चिचघाट, ता. चिमुर), कैलाश वासुदेव आलाम (वय ४०, रा. जामणी, ता. चिमुर) आणि गणेश आनंदराव पेंदाम (वय ३४, रा. जामणी, ता. चिमुर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर इतर तीन आरोपी अंधाराचा व परिस्थितीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची व डावाची पंचांसमक्ष पाहणी केली असता, जुगाराच्या डावावर व आरोपींच्या अंगझडतीत रोख १६०० रुपये, ५२ ताश पत्ते आणि ५ जुन्या दुचाकी गाड्या (क्रमांक MH 31 BS 8286, MH 32 R 8179, MH 34 AJ 8721, MH 34 AQ 7927, MH 34 CITY 7135) असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुमित ईश्वर कांबळे यांच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी अटक केलेल्या व फरार झालेल्या आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment