चंद्रपूर मनपाचा पेच सुटणार? संजय राऊतांनी स्पष्ट केली उद्धव ठाकरेंची भूमिका

February 04, 2026 by Prakash Hande

Sanjay Raut Statement Today : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका महापौर व गटनेता वादात कांग्रेस पक्षाचा तोडगा काही प्रमाणात निकाली लागला आहे, आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापौर पदाची मागणीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. (दिल्लीच्या बैठकीत धानोरकर गट वरचढ)

आम्ही विरोधात बसू पण भाजपात जाणार नाही, आमचा पाठिंबा कांग्रेस पक्षाला राहणार असे वक्तव्य आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

स्थानिक कांग्रेसच्या वादाचा तोडगा दिल्लीत निघाला त्यामध्ये महापौर हा प्रतिभा धानोरकर ठरवतील व उपमहापौर विजय वडेट्टीवार यांच्याकडे, 5 फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. Sanjay Raut Statement Today

शिवसेना खासदार राऊत यांच्या वक्तव्याने शिवसेना ठाकरे गटाच्या महापौर पदाच्या मागणीवर ब्रेक लागणार असे संकेत आहे. चंद्रपुरात शिवसेना-वंचित आघाडीने युती करीत निवडणूक लढली व चंद्रपुरात तब्बल 8 जागा युतीने जिंकल्या, शिवसेना-वंचित ने गट स्थापन केला आहे, पहिल्याच दिवसापासून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे महापौर पद जो पक्ष आम्हाला देणार आम्ही त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका जाहीर केली, मात्र पक्ष श्रेष्ठीचा आदेश आला की त्यांना महापौर पद सोडावे लागणार आहे.

कांग्रेस पक्षाने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून कांग्रेसचे नेते सुनील केदार यांनी शिवसेना नेत्यांसोबत भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. दिल्लीत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की परभणी व चंद्रपूर महानगरपालिका मध्ये एका ठिकाणी शिवसेना तर दुसऱ्या ठिकाणी कांग्रेसचा महापौर होणार आहे, यावर स्थानिक पातळीवर चंद्रपुरात शिवसेनेने महापौर पदाची मागणी केल्याचा प्रश्न केला असता त्यावर सावंत म्हणाले की कुणी काही मागणी केली असे चालत नाही सर्व निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.

वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या हालचाली बघता शिवसेनेला स्थायी समिती किंवा उपमहापौर पदावर शांत बसावं लागेल असे चित्र आहे.

कांग्रेस गट एकत्रीकरण करणे याबाबत सुनील केदार बघणार असून लवकरच धानोरकर-वडेट्टीवार गटातील नगरसेवकांचा एक गट होणार आहे.

Leave a Comment

+