नागभीड : ओबीसी जातनिहाय जनगणना सन २०२६-२७ मध्ये स्वतंत्र कॉलमसह करण्यात यावी, या मागणीसाठी नागभीड येथे मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय ओबीसी संघटनेच्या वतीने झालेल्या आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत पंतप्रधान आणि जनगणना आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या निश्चित झाल्याशिवाय शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि निधीतील वाटा ठरवता येणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला होता. (चंद्रपुरात सीजेपी स्वयंसेवकांना पोलिसांच्या नोटीस, वाचा हि बातमी)
ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या निश्चित झाल्याशिवाय शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व, आरक्षण तसेच अर्थसंकल्पातील निधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा निश्चित करता येणार नाही. त्यामुळे जनगणना प्रपत्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी नागभीडमध्ये धरणे आंदोलन
केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, २२ जानेवारी २०२६ आणि १४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रांमध्ये स्वतंत्र ओबीसी कॉलमचा स्पष्ट समावेश नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर येण्यासाठी स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या समोर येणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शिक्षण, रोजगार, आरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काचा वाटा निश्चित करण्यासाठी अचूक आकडेवारी आवश्यक आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असणे गरजेचे असून, सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करावा.”
या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिगांबर चौधरी, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, संघटनेचे उपाध्यक्ष शिवशंकर कोरे, सचिव श्रीपत मटाले, सिताराम बावणकर, पुरुषोत्तम बगमारे, दौलत समर्थ, विनाजी निकुरे, गजानन देशकर, हरिदास ठाकरे, अशोक समर्थ, डॅनियल देशमुख, राजू मोरांडे, प्रकाश चौधरी, नितीन हेमने, शुभम हेमने, सुधाकर राऊत, विष्णू मोहुर्ले, सौ. यामिनी निकोडे, सौ. गीता ठवरे, सौ. लता देशमुख, सौ. संगीता लडके, सौ. कुसुम चौधरी, सौ. प्रेमलता बाबनकर, सौ. रुंदा देशमुख, सौ. सुनिता डोईजड, सौ. उत्तरा कोरे, सौ. अलका बघमरे, सौ. मयुरी मोहुर्ले यांच्यासह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






