Savli Elephant Herd सावली तालुक्यातील शिवारात संचार करताना

सावली तालुक्यात पुन्हा हत्तींचा कळप दाखल; वनविभाग सतर्क

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 24, 2026

सावली: Savli Elephant Herd सावली तालुक्यात पुन्हा दाखल झाला आहे. गडचिरोलीकडून वैनगंगा नदी ओलांडून हत्तींचा कळप तालुक्यात पोहोचला आहे. करोली, आकापूर आणि गेवरा शिवारात हत्तींचा संचार दिसून आला. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (गुन्हेगारांवर वॉच ठेवणार AI, वाचा हि बातमी)

शेतीचे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता वनविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. हत्तींच्या कळपाच्या दिशेवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी हत्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Savli Elephant Herd सावली तालुक्यात दाखल

गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली आणि सावली या सीमावर्ती भागात वैनगंगा नदी ओलांडून हत्तींचे कळप सातत्याने ये-जा करत आहेत. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच ३२ हत्तींच्या मोठ्या कळपाने तब्बल महिनाभर सावली तालुक्यात ठिय्या मांडला होता. त्या दरम्यान सोनापूर येथे हत्तीच्या हल्ल्यात एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नासधूस झाली होती. आता पुन्हा हत्तींचा ताफा तालुक्यात शिरल्यामुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या हत्तींचा कळप कोणत्या दिशेने प्रवास करत आहे, यावर वनविभागाचे पथक बारीक लक्ष ठेवून आहे.

या पार्श्वभूमीवर सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हत्तींचा कळप दिसल्यास त्यांच्या जवळ जाणे, त्यांचे फोटो अथवा व्हिडिओ काढणे किंवा त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे टाळावे, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी हत्तींचा प्रभाव असलेल्या भागात विनाकारण फिरणे टाळावे आणि हत्तींची कोणतीही हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ वनकर्मचाऱ्यांना माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी सूचना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment