Sawali Chandrapur Crime संदर्भात चिचबोडी येथे पोलीस पथकाकडून तपास सुरू

“फक्त एका जेवणासाठी?” मुलाने केली बापाची हत्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 20, 2026

सावली : Sawali Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिचबोडी येथे कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना घडली आहे. जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने जन्मदात्या वडिलांवर काठीने वार करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. सावली पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. (आनंदवन चौकात गांजा, वाचा गुन्हेगारी बातमी)

Sawali Chandrapur Crime : चिचबोडीत जेवणावरून वाद आणि रक्तरंजित शेवट

जेवणाच्या कारणावरून बाप-लेकात उफाळलेला वाद शेवटी रक्तरंजित थरावर पोहोचला. पोटच्या मुलानेच काठीने केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना सावली तालुक्यातील चिचबोडी येथे शनिवारी रात्री घडली. मुकरू कवडू मलोडे (वय ५५ वर्षे) असे मयत वडिलांचे नाव असून, घटनेनंतर आरोपी मुलगा दिलीप मलोडे हा फरार झाला आहे.

काठीने झालेल्या हल्ल्यात मुकरू मलोडे यांचा जागीच मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिचबोडी येथील रहिवासी मुकरू मलोडे आणि त्यांचा मुलगा दिलीप मलोडे (वय ३० वर्षे) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जेवणाच्या मुद्यावरून सातत्याने खटके उडत होते. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर पाहता-पाहता हिंसक हाणामारीत झाले. संतापाच्या भरात दिलीपने घरातील काठी उचलून वडिलांवर सपासप वार केले.

या जीवघेण्या हल्ल्यात मुकरू मलोडे यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेची कुणकुण लागताच गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत मुकरू मलोडे यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. हत्येनंतर संशयित आरोपी दिलीप घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी सावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment