Sindewahi Gambling Raid प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी शिवणी गावाजवळ जुगार अड्ड्यावर धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतल्याचे दृश्य

Sindewahi Gambling Raid | सिंदेवाहीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 12 आरोपींवर गुन्हा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 23, 2026

Sindewahi Gambling Raid : सिंदेवाही – २२ मे रोजी भर दुपारी काही इसम हे जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (बल्लारपुरातील हरणे टोळीवर हद्दपारीची कारवाई)

सिंदेवाही पोलिसांची शिवणी गावाजवळ Sindewahi Gambling Raid

२२ मे रोजी सिंदेवाही पोलिसांना मौजा शिवणी गावातील मामा तलावाजवळ जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली असता काही इसम ५२ ताश पत्त्यावर हारजीत पैसे लावत जुगार खेळत होते.

पोलिसांनी या कारवाईत दुचाकी वाहन रोख रक्कमेसह एकूण १ लाख ३३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सुनील पांडुरंग ताडाम, विजय भास्कर गहाणे, सुधाकर शंकर बावणे, उमित शन्कर चौधरी, चेतन नामदेव गहाणे, पळालेले आरोपी प्रमोद कृष्णा बोरकर, शेखर मारोती अलोणे, गोलू ईश्वर शेंडे, सूरज विष्णू खोब्रागडे, प्रफुल महादेव अलोणे, अनिल सुखदेव आत्राम व विजय प्रकाश शेंद्रे यांच्यावर सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम १२ (a) अनव्ये गुन्हा दाखल केला.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment