Urjanagar Pocso Case accused Ravi Phale arrested by Durgapur Police Chandrapur

उर्जानगर पॉक्सो गुन्हा; खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची शिवसैनिकांची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 14, 2026

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. या Urjanagar Pocso Case अंतर्गत उर्जानगर कोंडी वॉर्ड क्र. ५ मधील एका ५२ वर्षीय नराधमाने आपल्याच १३ वर्षीय अल्पवयीन नातेवाईक मुलीवर वारंवार अतिप्रसंग केला. यामुळे सदर पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली असून, दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा निषेध करत शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

(पत्नीने केला पतीवर हल्ला, नागभीड तालुक्यातील घटना)

चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. 5 कोंडी येथे एक अत्यंत निंदनीय व हृदयद्रावक घटना घडली असून येथील 52 वर्षीय आरोपी रवी फाले यांनी आपल्याच नातेवाईकाच्या शिक्षणासाठी विश्वासाने पाठवलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग करून तिला गर्भवती केले. पोटदुखीमुळे मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ती 2 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली असता दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी रवि फाले विरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.

Urjanagar Pocso Case चा थरकाप उडवणारा प्रकार

परंतु सदर गुन्हा हा नातेवाईकांकडून झालेला विश्वासघात असून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारा आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. तसेच पीडित अल्पवयीन मुलीच्या भविष्याचा विचार करून तिला सर्वतोपरी मदत मिळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस पॉक्सो कायद्यानुसार कमाल शिक्षा देवून पीडित मुलीला वैद्यकीय मदत, मोफत उपचार, समुपदेशन व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

पीडित कुटुंबाच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्ह्यात व उर्जानगर परिसरात जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिवसेना महिला आघाडी बल्लारपूर संघटिका तथा राष्ट्रीय हिंदू महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष क्रिष्णाताई सुरमवार, राष्ट्रीय हिंदू महासभेच्या महिला जिल्हा महासचिव सुषमाताई वारजुरकर, जिल्हा सचिव संध्याताई तुरारे, शिवसैनिक करण कोलगुरी, निखिल सुरमवार उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment