Sunday, April 21, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपुर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कार्यरत खेळाडूंना सुवर्णसंधी

चंद्रपुर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कार्यरत खेळाडूंना सुवर्णसंधी

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर : केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील “अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा” दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय नियंत्रक मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्यावतीने त्या-त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.

 

या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेसाठी शासनाच्या विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागास सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले खेळाडू व कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिंटन फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, अथलेटिक्स, कबड्डी, शरीर सौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, खो-खो, योगासत्र, संगीत, नृत्य व लघुनाट्य आदी क्रीडा व कला प्रकारात सहभाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथून प्राप्त करून कार्यालय व विभाग प्रमुखांच्या मान्यतेने दोन प्रतीत (प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे) व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुंबई 400032 यांच्याकडे स्पर्धेपूर्वी टपालाद्वारे, व्यक्तिशः किंवा ई-मेलद्वारे sachivalayagym@rediffmail.com/sachivalayagym1954@gmail.com वर पाठवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

 

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!