Friday, February 23, 2024
Homeताज्या बातम्याजावई व मुलीची भेट घेऊन परत येत असताना घडला भयावह प्रकार

जावई व मुलीची भेट घेऊन परत येत असताना घडला भयावह प्रकार

भीषण अपघातात पती-पत्नी ठार

- Advertisement -
- Advertisement -

News34 accident

भंडारा / जावई व मुलीला भेटायला गेले परत येताना दाम्पत्य यांना वाटेत नातेवाईक भेटले ते रस्त्याच्या कडेला थांबले व त्यांच्यासोबत बोलू लागले मात्र त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने दोघांना चिरडले या भयावह अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले.

55 वर्षीय बालचंद ठोंबरे व 52 वर्षीय अनिता ठोंबरे राहणार सोनोली तालुका मोहाडी असे मृतकाचे नाव आहे, ठोंबरे दाम्पत्य हे स्टेशन टोली देवाडी येथे मुक्कामी राहत होते.

रविवार 27 ऑगस्टला भंडारा-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली, घटनेनंतर नागरिकांनी चक्का जाम आंदोलन केले, नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्याने परिस्थिती चांगलीच बिघडली होती.

मुलगी व जावयाची भेट घेऊन ठोंबरे दाम्पत्य घराकडे निघाले होते मात्र खरबी जवळ नातेवाईकांसोबत ते बोलण्यासाठी थांबले असा त्याचवेळी टिप्परने ठोंबरे दाम्पत्याला चिरडले, परिस्थिती हाताबाहेर गेली असता आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे यांनी नागरिकांची समजूत काढली.

तब्बल दीड तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली, मृतक बालचंद ठोंबरे हे रेल्वेत कार्यरत होते, घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहे.

 

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular