चंद्रपूर महिला कांग्रेस ने दिली पोलिसात तक्रार

News34

चंद्रपूर – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या श्री शिवप्रतिष्टान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी आणि काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे याना तात्काळ अटक करण्यासाठी अमरावती मध्ये आंदोलन केले त्यामुळे त्यांना ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली.

 

अश्या या दोन्ही समाजामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे, यासाठी आज चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी,चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे नेतृत्वात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजपूत साहेब यांना निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली.

यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश पदाधिकारी अश्विनीताई खोब्रागडे,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी माजी नगरसेविका विनाताई खनके,सकिनाताई अन्सारी,वंदनाताई भागवत ,अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष निशाताई ढोंगळे अल्पसंख्याक विभागाच्या महिला पदाधिकारी मुन्नीताई शेख ,महिला काँग्रेस च्या जयश्री जाधव ,सुवर्णा भारस्कर,अंजु वैरागडे ,लीला बुटले,तेजस्विनी पोडे, शीतल लेडांगे,यांचे सह महिला काँग्रेस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!