Tuesday, December 5, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीणअबब घरकुलच्या फाईल्सची चोरी

अबब घरकुलच्या फाईल्सची चोरी

पोलिसात गेले प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -

News34  गुरू गुरनुले

मुल:- दिनांक १ /८/२०२३ रोज मंगळवारला बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयामधील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील फाइल्स ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवले होते मात्र त्या फाईल्स ची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातीलच रोजगार सेवक गोविंदा कोम्मावार रा. बेंबाळ तसेच मुन्ना कोटगले भाजपा पदाधिकारी तथा माजी उपसरपंच रा. बेंबाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील फाइल्सची परस्पर चोरी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाची परिवार तथा ग्रामपंचायत सदस्यांनी केला.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार परस्पर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन कोणालाही विचारपूस न करता फाईलची सदर इसमांनी चोरी करून हडप केलेले आहे असे सांगितले.

 

ग्रामपंचायत कार्यालयातील फाईल कोणत्याही जबाबदार पदाधिकारी व ग्रामसचिवाला न विचारता परस्पर चोरी करून नेणे हा गंभीर गुन्हा असून सदर व्यक्तिंची तात्काळ चौकशी करून जर दोषी आढळल्यास गंभीर गुन्हा दाखल करावा व ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी तथा रोजगार सेवक गोविंदा कोमावार यांचेवर प्रशासकीय कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular