Thursday, June 20, 2024
Homeचंद्रपूर शहरआम आदमी पक्षाच्या आंदोलनासमोर प्रशासन नरमले

आम आदमी पक्षाच्या आंदोलनासमोर प्रशासन नरमले

अखेर अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला

- Advertisement -
- Advertisement -

News34

 

चंद्रपूर : येथील चांदा पब्लिक स्कूलमध्ये गत शैक्षणिक सत्रात दहावीत 84% गुणांसह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तनिष्का अनंत बलवीर हिला फी न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली होती.

या विरोधात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी स्वतःचे कपडे काढत अर्धनग्न आंदोलन शाळेच्या परिसरात सुरू केले . व आप च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली व आंदोलन तीव्र होत रात्री १० वाजे पर्यंत शाळा परिसरात सुरू होते. त्याची दखल तात्काळ जिल्हाधिकारी यांनी घेतली व त्यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी सुनावणी करण्याचे आदेश दिले व शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत पीडित तनिष्का अनंत बलवीर या मुलीला न्याय मिळाला.

चंद्रपूर येथील चांदा पब्लिकमध्ये ही मुलगी केजी 1 पासून शिकत आहे.अगोदर आई व २०१६ ला तिचे वडील मृत्यू झाली तेव्हा पासून ती काका कडे आहे . शाळेने परिस्थिती बघता फी लागणार नाही आम्ही जबाबदारी घेऊ असे २०१६ मध्ये सांगितले होते पण अचानक १० वी पास होताच शाळेने 70 हजार रुपये शुल्क भरण्याचा हट्ट शाळा प्रशासनाने केला.
अनाथ विद्यार्थिनी असूनही ७० हजार रुपये शुल्क भरण्याचा शाळेने तगादा लावला होता.

धक्कादायक म्हणजे, शाळेने शुल्काबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. अशा स्थितीत तनिष्का आणि तिच्या पालनकर्ता काकांना हा आर्थिक भार ऐनवेळी सोसावा लागला असता. ती अनाथ असल्याने फी घेणार नाही, असे चांदा पब्लिक शाळा व्यवस्थापनाने सांगितले होते. मात्र, आता दुसऱ्या शाळेत पुढील प्रवेशासाठी तिला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.मुलीने हवालदील होऊन आम आदमी पार्टी कडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

या विरोधात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून शाळेत आंदोलन करण्यात आले. यात प्रसार माध्यमांनी विषय जनतेसमोर आणला या आंदोलनात आप पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील केली. आम आदमी पक्षाने कठोर भूमिका घेत तनिष्काला न्याय देण्याची मागणी करीत रात्रीपर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने आपला हेका मागे घेत टीसी देण्यास तयारी दर्शविली.

अनाथ मुलीला न्याय मिळवून दिल्यामुळे सर्व स्तरातून आम आदमी पार्टी चे आभार व्यक्त करन्यात येत आहे यावेळी शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजु कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, सुनिल सदभया, सुधीर पाटील,पवन कुमार प्रसाद,संतोष दोरखंडे ,मधुकर साखरकर , ऍड तब्बसुम शेख, भिमराव मेंढे,भिवराज सोनी, रवी पुप्पलवार,ज्योती बाबरे,पवन कुमार प्रसाद, सूरज शाह,सुमित हस्तक,जितेंद्र भाटिया, दिपक बेरशेर्ट्टीवार, सागर कांबळे,अफझल अली तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!