Tuesday, May 21, 2024
Homeग्रामीण वार्तावरोरा तालुक्यातील नऊ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

वरोरा तालुक्यातील नऊ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

आमदार धानोरकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

- Advertisement -
- Advertisement -

News34

 

चंद्रपूर : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो, हे अत्यंत खेदाची बाब आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्यानंतर त्यांच्या वारसांचे वाताहात रोखण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व समजून पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या वरोरा येथे लोकाभिमुख कामांचा करूया निपटारा चला करू महसूल सप्ताह साजरा या कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी अमोल जांभुळकर, धनराज कुत्तरमारे, मंगेश घोडमारे, तानबा कुंभारे, शंकर देठे, नत्थू उईके, शरद चौधरी, बंडू कळस्कर, आशिष डेहने या वरोरा तालुक्यातील नऊ शेतकरी आत्महत्या प्रकरण आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. आज त्यांच्या कुटुंबियांना अनुदान वितरित करण्याबाबत.

याप्रसंगी शिवनंदा लंगडापुरे उपविभागीय अधिकारी वरोरा, कौटकर तहसीलदार वरोरा, लोखंडे नायब तहसीलदार वरोरा, राजेंद्र चिकटे माजी सभापती कृ. उ. बाजार समिती वरोरा, सर्व कर्मचारी तहसील कार्यालय वरोरा, बाधित शेतकरी,काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!