जनविकास सेनेने केली रुग्णालय मुक्ती आंदोलनाला सुरुवात

News34

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 3 वर्षासाठी हस्तांतरण केले होते मात्र मागील 8 वर्षे लोटल्यावर सुद्धा शासकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आजही तयार झाली नाही.

त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहे, अनेकांचे नाहक जीव जात आहे, अश्यातच परिचारिका सीमा मेश्राम यांचा उपचारअभावी मृत्यू झाला.

त्यामुळे या रुग्णालयाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. रुग्णालयातील दुरावस्थेच्या विरोधात जन विकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात ‘जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन करण्यात आले.

बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सामान्य रुग्णालयाच्या समोर जनविकास सेनेने एक तासाचे निदर्शने करून या आंदोलनाला केली.

रूग्णालयात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. अनेक डॉक्टर्स हजेरी लावून पगार घेतात. परंतु रुग्णसेवेचे काम करत नाही. सोनोग्राफीसारख्या तपासणीसाठी रुग्णांना अनेक महिने वाट पाहावी लागते. औषधीचा पुरेसा साठा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागते. अशा अनेक समस्यांनी या रुग्णालयाला ग्रासलेले आहे. या सर्व समस्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जनविकास सेनेने घेतली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने तात्पुरत्या स्वरूपात 3 वर्षांकरिता सामान्य रुग्णालय अधिष्ठाता यांना हस्तांतरित केले होते. मात्र मागील 8 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतःचे रुग्णालय तयार केले नाही. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.काही रुग्णांचे उपचाराअभावी जिव जात आहे. सामान्य रुग्णालय व शंभर खाटांच्या प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत जिल्हा शल्य चिकित्सक यांना परत करावी ही जनविकास सेनेची मागणी आहे. सामान्य रुग्णालय व प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या तावडीतून मुक्त होईपर्यंत जनविकास सेनेचे आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया आंदोलन दरम्यान देशमुख यांनी दिली.

जोपर्यंत सामान्य रुग्णालय व प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या तावडीतून मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला वेगळी दिशा देऊ, आज आमच्या आंदोलनाचा आम्ही नारळ फोडला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!